नेरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथीचा महोत्सवाची सुरुवात

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
मानवतेचे महान पुजारी श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सव गुरुदेव सेवा मंडळ नेरी तर्फे दिनांक 22/ 12/2022 ते 29/12/2022 डिसेंबर पर्यंत संगीतमय ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचार व प्रसार सप्ताह आयोजित केला आहे त्याप्रसंगी दिनांक 22 /12 /2022 रोज गुरुवारला सकाळी ठीक 9 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात घटस्थापनेने श्री विठाबाई कृष्णाजी भरडे यांच्या शुभहस्ते होत आहे. त्यानंतर गुरुवारला दुपारी ठीक 12 ते 4 वाजेपर्यंत महिला मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे या महिला मेळाव्यात सौ वृषाली धर्मपुरीवार ग्रामगीचार्य चंद्रपूर, श्रीमती वैशाली चुटे गुरुदेव सेविका तळोधी, सौ पुष्पलता बोरकर गुरुदेव तळोधी या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच 24/ 12/ 2022 रोज शनिवारला दुपारी ठीक 11.30 ते 3 वाजेपर्यंत गुरुदेव कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या गुरुदेव कार्यकर्ता मेळाव्यात माननीय ह. भ. प. डॉ. प्रशांत ठाकरे महाराज अकोला, मा. लक्ष्मणराव गमे, सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, मा. प्रकाशजी वाघ प्रचारक प्रमुख गुंरुकुंजआश्रम मोझरी, मा. पाटील दादा उप सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी मा. रुपलाजी कावळे सेवाधिकारी चंद्रपूर, मा. प्रकाशजी महाकाडकर सर, गुरुदेव कार्यकर्ता वरोरा, मा. राजभाऊ देवतडे संचालक गुरुकुंज आश्रम मोझरी लटारुजी मते जिल्हा प्रचारक चंद्रपूर, मा. बराटे साहेब जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर, मा. चरडे सर आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मा. सावरकर सर आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मोझरी मा. भास्कर वाढई जिल्हा कार्यकारी सदस्य, मा. भक्तदासजी जीवतोडे सर, ग्रामगीताचार्य या मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच 25/12/2022 रोज रविवारला वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे विषय आहे राष्ट्रसंतांचे जीवन चरित्र यात वर्ग 1 ते 7 प्राथमिक गट आणि 8 ते 12माध्यमिकअसे दोन गट आहे या सात दिवसीय दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे दररोज ग्रामसफाई ,त्यानंतर सामुदायिक ध्यान, प्रत्येक वार्ड मधून प्रभात फेरी, रामधून, रामधूनच्या म्हत्वावर मार्गदर्शन आणि दररोज रात्रीला 9 वाजता हरिभक्त परायण श्री प्रा डॉ. प्रशांत ठाकरे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार अकोला यांचे संगीतमय ग्रामगीता प्रवचन आणि प्रार्थनेच्या महत्त्वावर मार्गदर्शन या सर्व कार्यक्रमाची सांगता 29./12./2022 रोज गुरुवारला दुपारी ठीक 12 वाजता गोपालकाला आणि त्यानंतर गोपाल काल्यानिमित्ताने मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी ठीक 4.58 मिनिटांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यानंतर महाप्रसाद यांनी होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ नेरी व नेरी परिसरातील सर्व जनतेने गुरुदेव भक्तांनी घ्यावा अशी विनंती श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी आणि समस्त गावकरी मंडळी यांनी केलेली आहे.