निवडणूक विभागातर्फे घरोघरी वोटर स्लीप चे वाटप सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
निवडणूक विभाग यांच्या सूचनेनुसार 98 पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांच्या आदेशानुसार प्रत्येक मतदार साठी घरोघरी जाऊन वोटर स्लीप वाटप करण्यासाठी 98 पाथरी विधानसभा मतदार संघातील पाथरी तालुका 122 मानवत तालुका 105 परभणी ग्रामीण 106 व सोनपेठ तालुका 82 असे एकूण 415 मतदान केंद्र साठी एकूण 415 बि.एल.ओ.(मतदान केंद्र अधिकारी) यांच्याकडे दि.9 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र निहाय वोटर स्लीप चे वितरण निवडणूक नियुक्त कर्मचारी श्री जाधव,श्री गिराम,श्री सुधीर पाटील,श्री पंकज पवार यांनी केले व

बि.एल.ओ.मार्फत त्याचे घरोघरी वाटप होत आहे यामुळे प्रत्येक मतदारास मतदान करण्यासाठी मदत होणार आहे त्याच्या सोईचे होणार आहे यामुळे मतदान टक्केवारी वाढण्यास ही निश्चित मदत होणार आहे.98 पाथरी मतदार संघातील प्रत्येक मतदारास वोटर स्लीप प्राप्त होतील याची दक्षता प्रत्येक बि.एल.ओ.यांनी घ्यावी असे सक्त आदेश निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी दिले आहेत.