जिल्हा परिषद प्रशाला , हादगाव (बु.) शाळेचा संघ खो खो स्पर्धेत तालुक्यात प्रथम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी साई क्रीडा मैदान पाथरी येथे शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला हादगाव शाळेने 17 वर्षे वयोगटातील वर्षे मुलींचा संघ तालुक्यात अव्वल स्थानी राहिला.
सुरुवातीला प्रथम सामना तालुक्यातील शंकराव चव्हाण विद्यालय पाथरी सोबत लागला असून त्यामध्ये विजय मिळवला त्यानंतर द्वितीय सामना प.पू .चिंतामणी विद्यालय गुंज यांच्यासोबत झाला असून त्यामध्ये सुद्धा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली या अंतिम फेरीत तालुक्यातील स. गो. नखाते विद्यालय याचा दारून पराभव करत अंतिम सामन्यात विजय मिळवला , आणि 17 वर्ष वयोगटातील मुलींचा संघ जिल्हा स्थरावर खेळासाठी पात्र झाला. या खेळाडूंना श्री धनंजय नखाते , श्री सुधीर पाटील सर , श्रीमती सविता घोडके मॅडम , श्रीमती शुभांगी नखाते मॅडम , श्री गणेश नखाते सर यांचे मार्गदर्शन लाभले. याच वर्षी मागील महिन्यात जिल्हास्तरीय डॉज बॉल स्पर्धेत शाळेचा संघाने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्थरावर बीड येथे विभागीय डॉज बॉल स्पर्धा खेळण्यासाठी पात्र झाला असून त्यांना श्री नखाते सर व पाटील सर या दोन्ही क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्येही केंद्रीय स्तरावर व्दितीय क्रमांक राहिला , शाळेत शासनाने दिलेले प्रत्येक उपक्रम राबवले जातात क्रीडा स्पर्धा , सामान्यज्ञान स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन , भित्तीपत्रके स्पर्धा , तंत्रज्ञान शिक्षण , चला शिकूया प्रयोगातून विज्ञान , रोबोटिक्स , We Learn English इत्यादी बऱ्याच उपक्रमांत शाळा अव्वल स्थानी असते. इंप्सायर अवॉर्ड 2 विद्यार्थी , NMMS सारथी शिष्यवृत्ती आतापर्यंत 8 विद्यार्थी धारक , 5 वी शिष्यवृत्ती 2 विद्यार्थी धारक झाले आहेत.
त्यांचे तालुका गटशिक्षणाधिकारी श्री मुकेश राठोड साहेब , तालुका क्रीडा समन्वयक श्री तुकाराम शेळके सर , साधन व्यक्ती श्रीमती कचवे मॅडम , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री लक्ष्मणराव झिंजान , उपाध्यक्ष भगवानराव झिंजान , सर्व सन्माननीय सदस्य , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम व सर्व शिक्षकवृंद , गावकरी , पालक यांच्या कडून सर्व विजयी खेळाडू यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.