ताज्या घडामोडी

चारठाण्याजवळ एसटी बसने तिघा तरूणांना चिरडले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिंतूर – औरंगाबाद महामार्गावरील चारठाण्या पासुन एक किमी अंतरावर असलेल्या सिंगटाळा पाटी नजीक औरंगाबादहुन जिंतूरकडे जाणार्‍या एसटी बसने समोरून येणाऱ्या तिघा जणाना बसखाली चिरडले. या मध्ये तीन तरूण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी( दि.१३) संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
याबाबत आधिक माहिती अशी की, जिंतूर आगाराची औरंगाबादहुन जिंतूरकडे जात असलेली बस (क्रमांक एमएच १३ सी.यु.६९२१) व येलदरी येथून सेलूकडे जात असलेली दुचाकी (क्रमांक एमएच २१ ए.जे.६२५६) ही दोन वाहने सिगटाळा पाटीजवळ आली असता एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शेख अमीर शेख नजीर (वय १८ वर्ष), शेख मोबीन शेख नासेर (वय २२ वर्ष), अतीक रफीक टामटकरी (वय २० वर्ष सर्व रा. राजमोहल्ला सेलू जि.परभणी) हे तरूण जागीच ठार झाले. अपघातानंतर एसटी बस चालकाने एसटी बस जागेवर सोडुन पलायन केले. या अपघाताची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोहेका गुलाब भिसे, आचार्य, जानगर
आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चारठाणा गावकऱ्यांनी यावेळी मदत कार्य केले. मयताचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे समजते. अपघातापूर्वी याच बस चालकाने सोबत असलेल्या एका दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवरील दोन तरूण किरकोळरित्या जखमी झाले. नंतर हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close