रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी येथील मुस्लीम बांधवाची मागणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मुस्लिम समाजाचे प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर याच्यां बद्दल रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी बदनामीकारक व चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला व सर्व मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन दि.२१ आगष्ट रोजी पाथरी येथील महाराष्ट्र मुस्लीम समाज बांधवाच्यां वतीने उपविभागीय अधिकारी पाथरी,तहसिलदार पाथरी,पोलीस नीरीक्षक पाथरी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.
रामगिरी गुरु नारायण महाराज सरला बेट यांनी अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे सुरू असलेले सप्ताहाचे प्रवचन देत असताना सर्व लोक समक्ष लाईव्ह कार्यक्रम असताना त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या चारित्र्यावर अपशब्द वापर करून मुस्लिम समाजाचे भावना जाणीवपूर्वक दुखावल्या त्यांना माहिती असताना पैगंबर बाबत अपशब्द वापरले देशांमध्ये मुस्लिम सहन करणार नाही रस्त्यावर उतरणार यामुळे दंगली होणार ह्या हेतूने प्रवचन देऊन राज्यात कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे षडयंत्र करून प्रवचन दिले आहे. या कृतीचे मुस्लिम समाज निषेध करत असून अशे ढोंगी महाराज यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावे आपण या राज्याचे गृहमंत्री असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे याकरिता आम्ही सर्व मुस्लिम बांधव चे भावना लक्षात घेऊन याबाबत दखल घ्यावी मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पाथरी येथील महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाणच्या वतीनेउपविभागीय अधिकारी पाथरी मा. तहसीलदार पाथरी,पोलीस निरीक्षक पाथरी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.
अहेमद अन्सारी,अजहर शेख,ईफतेखार बेलदार,हाफेज जब्बार,सलीम फारोखी,शफी फारोखी,डाॅ.कबीर खान,नईम अन्सारी,अय्युब खान,मोहन जोशी,उध्दव ईंगळे,रेखाताई मनेरे,रईस कुरेशी,फेरोज अन्सारी,अलताफ अन्सारी,जफर अतार, मुसतफा अन्सारी, विठ्ठल साळवे,निवेदनावर आदीच्या स्वाक्षरी आहे.