ताज्या घडामोडी
सर्प मित्राने अजगर सापाला दिले जिवनदान

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
शिवापूर बंदर येथील गावतलावात अजगर असून तो मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेला आहे अशी माहीती शिवापूर बंदर वासियांनी फोन करुन सर्प मित्राला सांगीतले असता तात्काळ धाव घेत सर्प मित्र सुहास तूरानकर राहणार बंदर कॉलनी यांनी मच्छी च्या जाळ्यात अडकलेल्या अजगर या सापास जाळ्यातून मुक्त करून ताळोबा अभयारण्य मध्ये वनपरिक्षेत्र चिमूर यांच्या माध्यमातून सोडून जिवनदान दिले.याची शिवापूर बंदर तसेच बंदर कॉलनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्प मित्राचे कौतुक केले जात आहे.