ताज्या घडामोडी

जागतिक डॉक्टर्स डे १ जुलै पासून आर एच पी हॉस्पिटल सुरू – उमेश चव्हाण

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

पुणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या अंतर्गत पुण्यातील धानोरी येथे तब्बल ५३ ऑक्सिजन बेडचे छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटल निर्माण करून शेकडो रुग्णांवर उपचार केले. या तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटलचे रूपांतर आता कायमस्वरूपी केले असून कोंढवा येथे आरएचपी हॉस्पिटल जागतिक डॉक्टर दिनी म्हणजेच येत्या १ जुलै २०२१ पासून आपल्या सेवेत सुरूच होईल, असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
१ जुलै रोजी सुरू होणाऱ्या आरएचपी हॉस्पिटलच्या उद्घाटन पूर्वतयारीची बैठक सर्व सदस्य आणि संचालकांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उमेश चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर राज्यभाषा समितीचे सल्लागार डॉ. राम आगरवाल, प्रसिद्ध अभिनेते यशोधन बाळ, आदर्श सरपंच सुहास पांचाळ, रुग्ण हक्क परिषदेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष सारिका नागरे, फार्मासिस्ट असोसिएशनचे राजनभाई हौजवाला, प्रा. डॉ. गनी पटेल, रुग्ण हक्क परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष हाफिज शेख, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील आयटी सेल विभाग प्रमुख शैलेश खुंटये आदींनी मनोगत व्यक्त केले.
आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्यात आली असून रंग संगती आणि उत्कृष्ट पद्धतीच्या फर्निचर डिझाईन मुळे पंचतारांकित देखणे सुंदर असे आर एच पी हॉस्पिटल तयार झाले आहे. हॉस्पिटलमध्येच आयोजित केलेल्या बैठकीमुळे सर्वांनीच उद्घाटन होण्याआधी हॉस्पिटलचे काम पाहून समाधान आणि आनंद व्यक्त केला.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटल आपण भाडेतत्त्वावरील जागे मध्ये सुरू केले होते, मात्र कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटल हे आपण खरेदी केलेले, आपल्या मालकीचे, आपल्या स्वतःचे आहे, यामध्ये अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री, ऑपरेशन थिएटर, आयसीयू विभाग, असे ४० बेडचे भव्यदिव्य हॉस्पिटल निर्माण केले आहे. येथे सर्व पद्धतीचे उपचार केले जाणार आहेत.
या बैठकीच्या यशस्वितेसाठी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठ्ये, अल्ताफ तारकश, गिरीश घाग, वनिता पंडित, कल्पना जगताप यांनी परिश्रम घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल निर्मितीसाठी उल्लेखनीय योगदान केलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजय जोशी यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन दिव्या कोंतम तर आभार डॉ. सलीम आळतेकर यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close