अखेर गटग्रामपंचायत पेठभान्सुली- खंडाळा येथे तुळसाबाई देविदास श्रीरामे यांची सरपंच पदी पुनच्छ निवड
मुख्य संपादक : कु.समिधा भैसारे
एकाच कार्यकाळामधे दोनदा सरपंच पदाचा बहुमान
तुळसा श्रीरामे यांचा नावे, ग्रामपंचायत इतिहासातील रेकार्डबुकवर पहील्यांदाच त्यांचा नावाची नोंद…
चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेली पेठभान्सुली गटग्रामपंचायत यामध्ये खंडाळा गाव समाविष्ट असुन दोन्ही गाव मिळुन पेठभान्सुली गटग्रामपंचायत आहे . सात सदस्यांची ग्रामपंचायत कमीटी असुन त्यामधे १२/०२/२०२१ पासुन ते २/०२/२०२३ पर्यंत सौ.तुळसा देविदास श्रीरामे सरपंच पदावर कार्यरत असुन गावातील विकासकामे केलीत परंतु मधेच ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास घेतल्या मुळे सरपंच पद रिक्त झाले व सरपंच माडमवरील आरोप खोटे ठरले त्यानंतर ७/५/२०२४ तारखेला सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये तुळसाबाई देविदास श्रीरामे यांनी सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज निवडणुक अध्यासी अधीकारी कडे दाखल करण्यात आला व उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला. सौ.तुळसा देविदास श्रीरामे यांची सरपंच पदी पुनच्छ निवड करण्यात आली.. ग्रामपंचायत कारभार सुरू असुन तुळसाबाई श्रीरामे सरपंच पदावर कार्यरत आहेत …
अशाप्रकारे एकाच कार्यकाळामधे दोनदा सरपंच पदाचा बहुमान तुळसा श्रीरामे यांचा नावे असुन पेठभान्सुली गट ग्रामपंचायत इतिहासातील रेकार्डबुकवर पहील्यांदाच दोनदा सरपंच पदी तुळसा देविदास श्रीरामे त्यांचा नावाची नोंद झाली आहे… गावकऱ्यांन मधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..