गौरक्षक सेना परभणी च्या वतीने हिंदू विश्व स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज गौरक्षक सेना परभणी जिल्हा वतीने सप्तशृंगी माता पान मंदिर शिवशक्ती बिल्डिंग समोर वसमत रोड परभणी दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे संतोष श्रिसागर आप्पा शेख सोहेल बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश आवटे जयंती महोत्सव समिती आयोजक गौरक्षक सेना परभणी जिल्हा वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष चंपालाल देवतवाल ठाकूर यांच्यावतीने आयोजन व सर्व आयुर्वेदिक साबण वाटप करण्यात आली राष्ट्र राजमाता गोमाता प्रत्येकाने सेवा करा गाईची गोरक्षण करा 31 कोटी देवतांना सर्व जगातले मंदिर रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज आपल्याला हा हिंदूधर्म टिकून आहे प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय शहाजीराजे की जय जय जिजाऊ जय शिवराय संभाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम जय गोमाता घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती गौरक्षक सेना परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा सप्तशृंगी पान मंदिर सेंटर संचालक चंपालाल देवतवाल यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली .