ताज्या घडामोडी

पिंपळगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत खत बचत दिन साजरा

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

नेरी वरून जवळ असलेल्या पिपळगाव येथे कृषी विभागा मार्फत कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने दि 27 जूनला तालुक्यातील पिपळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत बचत दिन साजरा करण्यात आला तसेच पिकांची काळजी संगोपन व खताबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
कृषिविभागा च्या वतीने दि 25 जून ते 1 जुलै पर्यंत कृषि संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे यादरम्यान कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेती विषयी पिंकांबद्दल बियानाबदल खताबद्दल मार्गदर्शन करीत असून शेतकऱ्यांना कृषिचे महत्व पटवून देत आहेत याच संदर्भात नेरी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी राजू निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिपळगाव येथील शेतकरी आनंदराव सोमा बारेकर यांच्या बांधावर खत बचत दिन साजरा करण्यात आला तसेच दहा टक्के खताची बचत कशी होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी अधिकारी स्वतः उपस्थित राहून शेतात अझोला उत्पादन निर्मिती गृहाची निर्मिती करण्यात येऊन अनेक शेतकऱ्यांना बांधावर सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी निखारे यांनी अझोला म्हणजे काय आहे पिकांसाठी त्याचे काय महत्व आहे त्याचा उपयोग कशा करायचा हे समजावून सांगितले आणि एम आर जी एस अंतर्गत एन ए डी आर पी कंपोज चे टाके बांधणे अझोला युनिट तयार करणे बांधावर फळबाग लावणे इत्यादी विषयावर माहिती सांगण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी राजू निखारे नेरी कृषी सहायक शिवकुमार टेकमाळे आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close