ताज्या घडामोडी

अनुरागजी चंद्रा इलेक्शन ऑबजरवर यांची प.पू. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरीस भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी आदरणीय श्री अनुरागजी चंद्रा इलेक्शन ऑबजरवर तथा जॉइंट कमिशनर आय टी (टीडीएस) उदयपूर, यांनी प.पू. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भेट देऊन प.पू. श्रीसाईबाबांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन श्रींची पाद्य पूजा केली. या पाद्यपूजेचे पौरोहित्य संस्थेचे पुजारी श्री योगेश इनामदार गुरुजी वाळूजकर शास्त्री यांनी केले. आदरणीय अनुरागजी चंद्रा यांनी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शैलेशजी लाहोटी यांच्याकडे साई मंदिर विकास आराखड्याबाबत असतेवायिकपणे चर्चा करून माहिती घेतली. श्री साई स्मारक समिती व्यवस्थापन मंडळाच्या वतीने श्री एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा यथोचित आदर सत्कार केला.


याप्रसंगी मा. श्री. शैलेशजी लाहोटी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, मा.श्री.शंकर हंदेश्वर तहसीलदार, तसेच मा.सौ. छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका यांची उपस्थिती होती अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे प्रताप आमले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close