ताज्या घडामोडी

उच्च शिक्षण ही काळाची गरज – श्रीमती सुमन मोरे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

उच्च शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत परंतु त्यासाठी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी सातत्य व चिकाटी हे गुण आत्मसात करून यु. पी. एस.सी., एम.पी.एस.सी. कडे वळावे. उच्च शिक्षण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्रीमती सुमन मोरे तहसीलदार तथा दंडाधिकारी पाथरी यांनी केले.
श्रीमती शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथे दिनांक 17 जून 2022 शुक्रवार रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ. भावनाताई अनिलराव नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सौ. ऐश्वर्या शैलेश लाहोटी, तसेच मुख्याध्यापक यादव एन. ई. हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के.एन. यांनी केले.
फेब्रू / मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस. सी परीक्षेत प्रस्तुत उच्च माध्यमिक विद्यालयातून 242 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यालयाचा एकूण निकाल 98.96% एवढा लागला असून 42 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. ऐश्वर्या शैलेश लाहोटी यांनी यथोचित मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या आध्यक्षा सौ. भावनाताई अनिलराव नखाते यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पल्लवी स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन शेळके टी. यस. यांनी केले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟨 शिक्षणातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली – सौ. ऐश्वर्या लाहोटी.
विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवावे हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन सौ. ऐश्वर्या लाहोटी यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
🟨 मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पालकांनी जागरूक व्हावे – सौ. भावनाताई नखाते.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी अनेक आडथळे निर्माण होत असतात त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते या दृष्टीने पालकांमध्ये जागृती होणे आत्यंत आवश्यक आहे असे आवाहन सौ. भावनाताई नखाते यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close