आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांची हनुमान मंदिर येथे सदिच्छा भेट
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
हनुमान जन्मोउत्सव निमित्त सर्वाधर्मीयांचे नेते सन्माननीय आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी नागरिकांच्या विनंतीला मान देऊन, वेळात वेळ काढून शाहू नगर व शिक्षक कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सन्माननीय आ. बाबाजानी साहेब यांनी शाहू नगर येथील हनुमान मंदिरास लवकरच कंपाउंड वॉल करणार असल्याचे उपस्थित नागरिकांना सांगितले.
तसेच शिक्षक कॉलनी येथे सुद्धा मंदिर परिसरात गट्टू, दोन रूम व स्वच्छता गृह,सुशोभीकरण करून देतो असे यावेळी जाहीर केले.
बाबाजानी साहेब यांनी या पूर्वी या दोन्ही मंदिराचा विकास केला असून, शिक्षक कॉलनी व शाहू नगर येथे त्यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडप दिलेली आहेत. होणाऱ्या नवीन विकासकामामुळे परिसरातील सौन्दर्यात भर पडणार असून येथील नागरिकांना सुद्धा कौटुंबिक साक्षगंध,वाढदिवस, इ कार्यक्रमासाठी उपयोगी होणार आहे.