जिजाऊ ब्रिगेडने आरोग्य शिबिर आयोजित करुन केला चंद्रपूरात आगळा वेगळा महिला दिन साजरा
अनेकांनी केले या उपक्रमाचे कौतुक
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूरच्या जिजाऊ ब्रिगेडने दि. 23 मार्च 2024 ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलां आरोग्य तपासणी शिबिर तथा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मराठा सेवा संघ भवन, आक्केवार वाडी, तुकुम, या ठिकाणी केले होते.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड महानगर अध्यक्षा सारिका कुचनकर तर उद्घाटक म्हणून डॉ. मनिषा घाटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीषा वासाडे, डॉ कल्पना गुलवाडे, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. नगीना कोल्हे, पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना चौधरी प्रामुख्याने उपस्थीत होत्या.
शिबिरात उपस्थित महिलांचे शुगर, बीपी, थायरॉईड, आदि तपासण्या करण्यात आल्या. सोबतच सरवाईकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, या आजारांसह महिलांच्या विविध आरोग्यविषयक अडचणींच्या संदर्भाने उपस्थित सर्व डॉक्टर भगिनींनी मार्गदर्शन करून महिलांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी मोहितकर, सूत्रसंचालन शुभांगी आसुटकर यांनी तर आभाप्रदर्शन पुष्पा काकडे यांनी केले. जिजाऊ वंदनेचे गायन अल्का टोंगे आणि कविता गोखरे यांनी केले आयोजित
कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा व महानगर कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच तुकूम, इंदिरानगर, जगन्नाथ बाबा नगर, नीरज कॉलनी, लक्ष्मी नगर, छत्रपती नगर , स्नेह नगर, बिनबा गेट, ऊर्जानगर शाखेतील पदाधिकाऱ्यांसह चंद्रपूर शहरातील महिलांची मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.