चिमुर नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
दि .१० नोव्हेंबर रोज मंगळवार ला चिमुर येथील किल्ला सभागृहात नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभागानुसार आरक्षण सोडत सभा पार पडली त्यात प्रभाग क्रमांक .१ ) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव , ( २ ) सर्वसाधारण महिला ( ३ ) अनुसूचित जाती ( महिला ) ( S.C ) , ( ४ ) अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) , ( S.T ) ( ५ ) सर्वसाधारण , ( ६ ) सर्वसाधारण ( महिला ) , ( ७ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( सर्वसाधारण ) , ( ८ ) सर्वसाधारण ( ९ ) अनुसूचित जमाती ( महिला ) ( S.T ) ( १० ) सर्वसाधारण ( ११ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( सर्वसाधारण ) ( १२ ) अनुसूचित जमाती ( महिला ) ( S.T ) , ( १३ ) सर्वसाधारण ( १४ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ( १५ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ( १६ ) सर्वसाधारण ( महिला ) ( १७ ) अनुसूचित जाती ( महिला ) अशाप्रकारे १७ प्रभागांमधील आरक्षण तपशील जाहिर करण्यात आले .जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाबद्दल कुठलीही सुचना किंवा आक्षेप १८ नोव्हेंबर २०२०ते २६ नोव्हेंबंर २०२० पर्यंत नोंदविता येतील असे जाहीर करण्यात आले हि आरक्षण सोडत उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ , चिमूर नगर परिषद चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर , व अन्य पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .