तारसा खुर्द येथे असलेले ग्रामपंचायत कार्यालय तारसा बुज येथे हलवण्याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
सन 1993 ते 1994 पासून तर आजस्थितही ग्रामपंचायत कार्यालय तारसा खुर्द येथेच आहे तेथील असलेले ग्रामपंचायत कार्यालय कायमचे तारसा बूज येथे हलविण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आल्याची माहिती तारसा बूज ग्रामपंचायत सद्यस निकेश बोरकुटे यांनी आज दिली आहे.
गोंडपिपरी तालूक्यातील तारसा (बुज )आणि तारसा(खुर्द) या दोन गावासाठी एकच गट ग्रामपंचायत आहे.
सन १९९३-९४ पासून ही गट ग्रामपंचायत तारसा खुर्द येथे असून आज स्तिथीला ग्रामपंचायत कार्यालय तारसा खुर्द येथे आहे.
मात्र ग्रामपंचायत ही तारसा(बुज) च्या नावाने असुन, कार्यालय तारसा खुर्द या गावात असल्याने गावातील नागरिकांना कामकाजासाठी ग्रामपंचायत कार्यालय असलेल्या तारसा खुर्द येथे जावे लागत आहे.याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
तारसा बुज या गावाचा मान व इतिहास जपण्यासाठी तारसा बुज येथे ग्रामपंचायत हलवण्यात यावी याकरिता गोंडपीपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मा.बुलकुंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तारसा बूज ग्रामपंचायत सदस्य निकेश बोरकुटे, माजी उपसरपंच अमित फरकडे, सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवार उपस्थित होते.