जिल्हयात पशुसंवर्धन कर्मचारी कार्यतप्तर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जिल्हा उपआयुक्त अधिकारी शिवाजीराव कुरेवाड यांचे जिल्ह्यातील प्रत्येक श्रेणी वरती विशेष लक्ष्य.
शेतकरी आपली शेती करत असताना सदैव पशू पालन करत असतो परंतु या पशूंची काळजी घेणे सुधा तेवढच गरजेचं मानल्या जात.
या गोष्टीची जाणीव ठेवत आपली कार्य तप्तरता गतीने करत असल्याची जनतेत चर्चा.
अनेक ठीक ठिकाणी जनावरांच्या बाबतीत समस्या पशुवैद्यकीय दवाखान्यात येऊन सांगताच डॉक्टर हजर होत असल्याचेही बोलल्या जात आहे तालुका अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली.पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ आष्टी अंतर्गत राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत लाळखुरखुताचे लसीकरण सुरळीत करण्यात आले. श्रेणी अंतर्गत असलेल्या गावामधे थेट सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांना यांना एक दिवस अगोदर सूचना देऊन गावातील शेतकरी बांधवांनी लाशिकरणासाठी गावातील मोकळ्या जागी आणण्यात यावे अशी सूचना देत साखळी पद्धतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी अंतर्गत असलेल्या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली लसीकरण मोहिमेत ६ महिण्यावरील सर्व जनावरांना लस टोचण्यात आली असल्याची सविस्तर माहिती पशुवद्यकीय दवाखाना आष्टी येथील कर्मचारी यांनी दिली.