ताज्या घडामोडी
काँगेस पक्षाचे खेमजई येथे जन जागरण अभियान
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई वरोरा
वरोरा :- पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेलाच्या महागाई, बेरोजगारी विरुद्ध केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.१९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ रोजी वरोरा तालुक्यातील गाव खेमजई येथे लोक जागरण अभियाना अंतर्गत मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत होत आहे. १९ नोव्हेंबर ला सायंकाळी ६.०० वाजता गाव खेमजई येथे रात्रो कार्यक्रम व मुक्काम तसेच २० नोव्हेंबर ला सकाळी ६.०० वाजता जनजागरण प्रभातफेरी ला सुरवात होणार आहे तरी वरोरा तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटी महिला,पुरुष,युवक,NSUI, सर्व सेलचे पदाधिकारी, न.प.पदाधिकारी, पं.स. पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाहन करण्यात आले.