ताज्या घडामोडी

तेलगांना राज्यातील निर्मल जिल्हात भाजपा पदाधिकाऱ्यांसह संघटनात्मक बैठक घेतांना खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते

तेलगांना राज्यातील निर्मल जिल्हात भाजपा पदाधिकाऱ्यांसह संघटनात्म

बैठक घेतांना खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांना खानापूर,निर्मल, मुधोली या तिन्ही विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली.या क्षेत्रातील भाजपा चे संघटन वाढण्याचे काम करण्यासाठी आज निर्मल, खानापुरातील खड़म,व मैसा मुधोली येथे भाजपा आघाडीयांसह, पदाधिकाऱ्यां सोबत संघटनात्मक बैठक घेण्यात आली.

या तिन्ही विधानसभेत फीरून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी,संघटन व नियोजनबद्ध कार्यपद्धती यावर निवडणूक कशी जिंकता येईल,
याकरिता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगले प्रभावीपणे काम करावे.तरचं निवडणूकीत भाजपाच विजय नक्की होईल असा विश्वास खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.

भाजपा संघटनात्मक आयोजित बैठकीला अध्यक्षीयस्थानी खासदार तथा निर्मल तेलंगाना निवडणूक प्रमुख अशोकजी नेते यांनीही बोलतांना देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांनी नव वर्षाच्या केलेल्या कार्याचा व योजनांची माहिती देत भाजपा संघटन व निवडणूक नियोजन संबंधित उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,यांचे तिन्ही विधानसभा क्षेत्रात शाल श्रीफळ देऊन मानसन्मान करण्यात आले.
माजी आमदार माहेश्वर रेड्डी यांच्या वार रूम ला या प्रसंगी भेट

या प्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार निर्मल जिल्हाचे माहेश्वर रेड्डी, आय टी.सेल प्रमुख रंजीत नाईक (आडे,) जिल्हा निर्मल चे महामंत्री मेडीसेमे राजू,विस्तारक विलास गादे,जनरल सेक्रेटरी सामा राजेश्वर रेड्डी,आयना गहारी बोमया आदिलाबाद प्रमुख, खानापूर विस्तारक पठाला रायसेखत,जिल्हा महामंत्री मल्ला रेड्डी, एस.टी.मोर्चाचे महामंत्री अशोक साटला,जिल्हा महामंत्री रमेश कोटेरी,आदिलाबाद जिल्हा अध्यक्ष राजू मरापा,अनु .जाती मोर्चाचे गड्डम रविदर,विधानसभा मुधोलचे विस्तारक ताळेवार साईनाथ, जनरल सेक्रेटरी मुधोल गंगाधर,ग्रामीण अध्यक्ष मल्लेश,सुमन,नारायण रेड्डी, मोहनराव पटेल, तसेच भाजपा पदाधिकारी,आघाडीयांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close