जिल्हा परिषद शाळा वाघाळा ची सुमन पवार विभागीय स्तरावर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी तसेच परभणी जिल्हा मैदानी क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा क्रीडा संकुल परभणी या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पाथरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत १४ वर्षाखालील मुली च्या गटामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाघाळा येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.सुमन शंकर पवार हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारामध्ये रजत पदक जिंकून यश प्राप्त केले . वाघाळा येथील ही खेळाडू औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे . सुमन पवार हिला शाळेचे क्रीडा शिक्षक शेख मुजीब यांनी प्रशिक्षित केले.
खेळाडूच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साळुंके, जिल्हा परिषद सदस्य माणिक आप्पा घुंबरे, वाघाळा चे सरपंच बंटी काका घुंबरे, गटशिक्षणाधिकारी मुकेश राठौर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कुमार घुंबरे, तुकाराम शेलके, स्वामी यु जी, सुमित लांडे, शंकर धावरे, संदीप सुत्रावे, अरविंद जाधव, सचिन वाघ,श्रीनिवास कासले, चव्हाण सुनयना,ज्योती गोरे, स्नेहल येवले, प्रदीप खाजेकर, सुशीला किरवले आदींनी अभिनंदन केले.