किड्झी स्कूल येथे दंतचिकित्सा शिबिर
प्रतिनिधी: योगेश मेश्राम
चिमूर येथील किड्झी स्कूल येथे दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. ५) करण्यात आले होते. यासाठी डॉ. प्रितम पोहनकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या दंतचिकित्सा शिबिरात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीच्या सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे दात आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी डॉ. प्रितम पोहनकर यांनी विद्यार्थ्यांना ब्रश करण्याची पद्धत,कोणत्या पद्धतीने ब्रश वापरावे तसेच दातांची निगा कशी राखायची, कोणते खाद्यपदार्थ खावे आणि खाऊ नये याबाबत मार्गदर्शन केले.
हे दंतचिकित्सा शिबिर किडझी कॉन्व्हेन्टच्या को-ऑर्डिनेटर प्रियंका चांदेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. या शिबिरासाठी तेजस मिसार सर, विद्या मडावी, संस्कृती बोकारे, अर्चना धापटे, भाग्यश्री भोपे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.