ताज्या घडामोडी

बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन गावागावांत चेतनादायी काम : डॉ.इसादास भडके

भानुदास पोपटे लिखित ‘आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ’ ग्रंथाचे थाटात प्रकाशन !

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आणि त्यानंतर स्वाभिमान आणि हक्काच्या लढाईत अनेकांचे योगदान आहे. शहरीभागा सोबतच डॉ.बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन खेड्यापाड्यात,गावा गावात चेतना निर्माण करण्याचे काम झाले असल्याचे मनोगत महाराष्ट्रातील सुपरिचित साहित्यिक डॉ.इसादास भडके यांनी आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ या ग्रंथाच्या दोन खंडांच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षिय भाषण करताना व्यक्त केले.

◻️🔸 चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील साहित्यिक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ’ या ग्रंथाच्या दोन खंडांचे प्रकाशन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे दि.३० जुलैला (रविवारी )शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. ◻️🔸ग्रंथाचे प्रकाशन वरोरा येथील प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत ऍड. मनोहर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळेस विचारमंचावर अध्यक्ष डॉ.इसादास भडके,प्रमुख अतिथी प्रसिद्ध विधीज्ञ तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील,ग्रंथाचे लेखक भानुदास पोपटे,पत्रकार जितेंद्र सहारे,कवि सुरेश डांगे आदिं मान्यवर उपस्थित होते.यावेळेस पुढे बोलताना डॉ.भडके यांनी आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करण्याकरीता या संदर्भ ग्रंथाची भर पडल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड.भूपेश पाटील यांनी संगणक आणि मोबाईलच्या या युगात आताच्या पिढीला सर्व तांत्रिक,शैक्षणिक ज्ञान भांडार उपलब्ध झाले आहे याच सोबत फुले,शाहु,आंबेडकर यांचे विचार यांच्या ज्ञानाची आवश्यकता असल्याचे सांगितले.सध्यस्थितीत लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे होत असल्याचा संताप व्यक्त केला.याप्रंसगी मान्यवरांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांसह ग्रामसभेच्या माध्यमातून पर्यावरण सरंक्षण व पाणलोट क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे प्रा.निलकंठ लोनबले यांचे शाल,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन प्रतिष्ठानतर्फे या प्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुरेख संचालन सुरेश डांगे, प्रास्ताविक हरी मेश्राम तर उपस्थितीतांचे आभार प्रकाश कोडापे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी,नितीन पाटील,कैलास बोरकर,प्रकाश कोडापे,मनोज राऊत,अजिंक्य पोपटे, विश्वास जनबंधू,ऋषिकेश मोटघरे आदिंनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close