महिला राज्य महिला बचत गट महासंघाचे चंद्रपूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्यातील महिला महिला बचत गटाचे अंगणवाडीवार पुरवठा करण्याचे काम मार्च 2024 पासून जस्ट कंपनीला मिळाले आहे त्यामुळे महिला बचत गटावर उपासमारीची वेळ आलेली आहे .चंद्रपूर जिल्ह्यात पाचशे महिला बचत गट असून पाच हजार महिला बेरोजगार झालेल्या आहेत
तद्वतच त्याच्या टीएचआर मशिनरीच्या कर्जाची परतफेड अजून पर्यंत झालेली नाही.महिला बचत गटाचे टीएचआर पुरवठा करण्याचे काम बंद झाल्यामुळे जस्ट कंपनीला मिळालेल्या टीएचआर पूरवठा करण्याचे काम महिला बचत गटाला मिळाल्यास त्यांना रोजगार मिळेल व जिल्ह्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यास मिळेल महिला बचत गटाकडे गोदाम वाहतूक व्यवस्था व मनुष्यबळ असल्यामुळे त्या पुरवठ्याचे काम करू शकतात त्यामुळे ते काम महिला बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला बचत गट महासंघ चंद्रपूर जिल्हाची आहे.या रास्त मागणी साठी महिला बचत गटाच्या विस महिला उद्या दि. १४फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती महिला बचत गटाच्या जिल्हाध्यक्षा अंजली परकवार व सुष्मिता लांडे यांनी या प्रतिनिधीस आज दिली .या वेळी सपना नगराळे, सुनिता काकडे,कांता वरडकर,तन्नू पठाण, सुनिता पंटकुटवार उपस्थित होत्या.दरम्यान या बुमदत उपोषणाला चंद्रपूर आयटकचे रविन्द्र उमाठे, प्रकाश रेड्डी यांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.