ताज्या घडामोडी

कराड शिवाजीनगर हाउसिंग सोसायटीत चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद

दागिन्यांसह 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड

कराड येथील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी कराड येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक चारचाकी वाहन असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिवंडी, जि. ठाणे) व निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील पंधरा दिवसापूर्वी कराडातील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरट्यांनी घराची खिडकी उचकटून खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून 38 लाख रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. सदर गुन्ह्ययाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबांबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखा कराडचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी, साक्षीदार व आजूबाजूच्या लोकांकडे तपास केला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close