ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभावान, विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बघावे- डॉ. अजय पिसे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अतिशय प्रतिभावान असून, योग्य संसाधन उपलब्ध नसल्यामुळे व शिक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या प्रतिभावान विद्यार्थांचे खूप नुकसान होत आहे. तरीही हतबल न होता विद्यार्थांनी स्वतःवर विश्वास ठेवून मोठे स्वप्न बघावे, संघर्षातून यश नक्कीच मिळेल. असे मार्गदर्शन प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी दागोजी पिसे महाविद्यालय नेरी येथील शिक्षक दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात केले.
नेरी येथील दागोजी पिसे महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्य विद्यार्थांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री सुरेशजी पिसे संस्थापक ,तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ अजय पिसे उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. चांदेकर, ब्रेन पॉवर अब्याकस चे संचालक लोकेश बंडे, उद्योग शाळा चे संचालक आदित्य पिसे मंचावर उपस्थित होते
सर्वप्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली पुढे बोलताना डॉ अजय पिसे यांनी शिक्षकांच्या समाजातील महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या प्रेरणेतूनच विद्यार्थी घडत असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन कठोर मेहनत घ्यावी व जीवनात यश संपादन करावे असे सांगितले यानंतर प्राचार्या चांदेकर यांनी डॉ राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय मार्गदर्शनात सुरेश पिसे यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शन करून शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या शिक्षक दिनानिमित्त स्वयं-शासनाचे आयोजन करण्यात आले होते यात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अध्यापनाचे कार्य केले आणि शिक्षकांच्या भूमिकेत स्वतःला अनुभवले होते अश्या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन तथा आभार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आणि कार्यक्रमाची अल्पोपहार वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.