ताज्या घडामोडी

राष्ट्र सेवा दल,चिमूर जिल्हा चंद्रपूर आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

तनुश्री मालके,तनिष्का भैसारे,प्रिया बनकर,आर्या स्वान,समीक्षा चन्ने,प्रिन्सी पाटील यांनी मारली बाजी

साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्र सेवा दल,चिमूरतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.दोन गटात घेतलेल्या या निबंध स्पर्धेत ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तालुक्याबाहेरून तसेच जिल्ह्याबाहेरूनही अनेक विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला.निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यात गट १ मध्ये प्रथम क्रमांक आर्या संजय स्वान,नेहरु विद्यालय चिमूर,द्वितीय क्रमांक समीक्षा दिलीप चन्ने,जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर तर तृतीय क्रमांक प्रिन्सी गौतम पाटील,श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर या विद्यार्थीनी गुणवंत ठरल्या आहेत.

प्रोत्साहनपर पारितोषिकांचे मानकरी संस्कृती अनिल बेंडे,नेहरु विद्यालय चिमूर,धानी संजय स्वान,नेहरु विद्यालय चिमूर,अंतरा पारस देवगडे,श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर,रुचिता अनिल ढोणे, श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर,आदित्य किरणकुमार मेश्राम,न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर,जिया जयदेव रेवतकर,न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर,तनुजा विलास चौधरी,अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा चिमूर,अनुष्का निकेतन ढवळे,लोक विद्यालय नेरी,खुशी गजानन मोईनकर,लोक विद्यालय नेरी,मयंक ज्ञानेश्वर बडवाईक, सरस्वती कन्या विद्यालय नेरी,शायली राजहंस मांडवकर,ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी,संस्कृती रमेश अलोणे,ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी,श्रीया लक्ष्मण राणे,जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर,हिमानी रमेश मंडलवार,नेवजाबाई हितकारिणी विद्यालय ब्रम्हपुरी,श्रद्धा रवींद्र चौधरी, जि.प.प्रा.उच्च शाळा टेकेपार,आसावरी नामदेव हेडाऊ,जि.प.उच्च प्रा.शाळा सावरगाव,शर्वरी गोकुलदास लेनगुरे, जि.प.उच्च प्रा.शाळा खडसंगी,स्वरा रामेश्वर गेडाम, जि.प.प्रा.शाळा गदगाव,श्वेता शिवदास मडावी,जि.प.उच्च प्रा. शाळा सोनेगाव(बे.), विद्या विनायक मेश्राम,जि.प.उच्च प्रा. शाळा कळमगाव ता. सिंदेवाही हे विद्यार्थी ठरले आहेत.

गट २ मध्ये प्रथम क्रमांक तनुश्री देवानंद मालके,नेहरु कनिष्ठ महाविद्यालय चिमूर,द्वितीय क्रमांक तनिष्का संजय भैसारे, दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालय नेरी तर तृतीय क्रमांक प्रिया प्रवीण बनकर,नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर या विद्यार्थीनीने पटकावला.

प्रोत्साहनपर पारितोषिकांचे मानकरी पायल नाकाडे,नेहरु विद्यालय चिमूर,दिव्या दिलीप गोठे,नेहरु कनिष्ठ महाविद्यालय चिमूर,सानिका प्रमोद सुकारे,लोक कनिष्ठ महाविद्यालय नेरी,आकाश मारोती ढोणे,दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालय नेरी,सानिया मनोहर हिंगे, दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालय नेरी,भूपेश गुणाजी नेवारे,मातृ सेवा संघ सोशल वर्क महाविद्यालय नागपूर हे विद्यार्थी ठरले आहेत.

पारितोषिकांचे स्वरूप दोन्ही गटात प्रथम क्रमांक १००१ रुपये,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुस्तक,द्वितीय क्रमांक ७०१ रुपये,तृतीय क्रमांक ५०१ रुपये तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक १०१ रुपये तथा सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र असे आहे अशी माहिती दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,रामदास कामडी,कैलाश बोरकर,हरी मेश्राम,संजय सर,बंडू नन्नावरे आदींनी दिली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close