प्रलय मशाखेत्री यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते पदी निवड
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे चंद्रपूर जिल्हा प्रवक्ते पदी प्रलय मशाखेत्री यांची नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितिन भटारकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
नुकतेच राज्यमंत्री चंद्रपूर येथे आले असता प्रलय ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला . अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त हा वक्ता आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची बुलंद तोफ धडाडणार असा विचार जिल्हा अध्यक्ष नितिन भटारकर यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रलय ला दुसरा मिटकरी अशी उपमा दिली होती , यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड , विधानसभा अध्यक्ष सुनील काळे , युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी , युवक सचिव अभिनव देशपांडे , शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे , सतीश मांडवकर , कुनाल ठेंगरे, कार्तिक निकोडे , विद्यार्थि जिल्हा अध्यक्ष सूचित उपरे , पंचायत समिती सदस्य पंकज धेंगरे , जिल्हा सचिव सिहाल नगराळे व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .