ताज्या घडामोडी

ग्लोबल रक्तदाते कोकण,महाराष्ट्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रक्तदान हे श्रेष्ठ दान,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र,२८जानेवारी २०२४रोजी आपल्या रक्तदान सेवाकार्याची६वर्ष पूर्ण करत आहे.म्हणून ७वे वर्ष पदार्पणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व राज्यस्तरीय ऑनलाईन रक्तदान कविता स्पर्धा पारितोषिक वितरण व आदर्श रक्तदाता व सामाजिक संस्थांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक २८जानेवारी रोजी सकाळी ९ते दुपारी२यावेळेत चिदानंद रक्तपेढी,शास्रीनगर हाॅस्पिटल,दुसरा मजला,डोंबिवली(पश्चिम)येथे आयोजित करण्यात आले आहे.थॅलेसेमिया ग्रस्त मुलांची व इतर गरीब गरजू ॠग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ लक्षात घेता आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा घेऊन शास्त्रीनगर शासकीय हाॅस्पिटल चिदानंद रक्तपेढी येथे भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी थिंक फाऊंडेशन(थॅलेसेमिया निर्मुलन मार्गदर्शक भारत)संस्थापक श्री.विनय शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच डाॅ.राजेश विनायक कदम(चार्टर प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायंमडस्),राजा शंकरदास(उद्योजक-मालवण),राजेश मानकर(साईकृपा कंन्स्ट्रक्शन,कणकवली)एॅड.प्रदीप बाविस्कर(वकील उच्च न्यायालय)यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.ग्लोबल रक्तदाते संस्था पार्टनर-हाॅटेल मालवणी मालवण/मंगलमूर्ती स्कुबा डायविंग मालवण. तसेच ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र,ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था,जनजागृती सेवा संस्था बदलापूर,सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ,श्री.विश्वकर्मा पांचाळ,सुतार समाज डोंबिवली,मालवणचो कट्टो प्रतिष्ठान,माझा सिंधुदुर्ग,आम्ही मालवणी या संस्थांनच्या सहभागाने हा भव्य रक्तदान सोहळा आयोजित केला आहे.रक्दानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी “ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र”आपणांस आवाहन व निमंत्रित करीत आहोत,आपली उपस्थिती प्राथनिय आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close