ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारमध्ये उत्साहाची कमतरता

ओबीसी आरक्षणाचा फटका

आधारभूत धान खरेदी केंद्र बंद

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा:- सुप्रीम कोर्टाच्या निकाला नंतर खऱ्या अर्थाने भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.मात्र ओबीसी प्रर्वगतील आरक्षीत जागा वगळून होत असलेल्या निवडणूक संदर्भात ओबीसी समाज कसा प्रतिसाद देते त्याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

भंडारा जिल्हा परिषद निवडणूक लागताच ओबीसी प्रर्वगाचे आरक्षण सुप्रीम कोर्टानी रद्द केल्याने निवडणुका होणार कि नाही असं समज राजकीय लोकांचा होता मात्र अखेर काल सुप्रीम कोर्टानी ओबीसी जागा वगळून निवडणूक द्यावी असे निर्देश दिले असताना भंडारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे.आज आलेल्या नवीन निवडणूक आयोगाच्या निर्णय नुसार जिल्ह्यात 21 डिसेंबर ला मतदान होणार असून मतमोजणी ही 22 ऐवजी 19 जानेवारी ला होणार आहे.शिवाय इतर ओबीसी जागांवर सर्वौच्च न्यालायने दिलेल्या निकालानुसार तिढा सोडवत 18 जानेवारी ला मतदान होणार आहे तर सद्याचा घडीला महाविकास आघाडीचे बडबडे नेते मुंबई सोडुन भंडारा आणि गोंदिया जिल्हा प्रचार सभा घेत असून भाजप प्रचारात व्यस्त आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढत आहे.महाविकास आघाडी आपल्या विकास कामांना घेऊन मैदानात उतरली असून या निवडणूकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वात जास्त गाजणार आहे. पण कुठल्याही नेता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसत नाही.आज मळनी होऊन आधारभुत धान खरेदी केंद्र बंद आहेत .त्यामुळे शेतकरी आणि ओबीसी समाज निवडणुकीला कसा प्रतिसाद देते त्याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे. भंडारा जिल्हा परिषदेत आता पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता जिल्ह्यातील शेतकरी ओबीसी समाज आणि महागाईने भरकटलेली जनता आपला आक्रोश कोणत्या पक्षावर काढेल हे अद्यापही सांगता येत नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close