ताज्या घडामोडी

चिमूर पोलीस विभागातर्फे श्रीहरी बालाजी महाराज गोपाल काल्या निमित्य भक्तांना महाप्रसादाचे वितरण

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

३९५ वर्षाची परंपरा असलेल्या चिमुर क्रांती नगरीतिल घोडारथ यात्रेला 5 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली, मात्र प्रत्यक्षात सोमवार दिनांक 14 फेब्रुवारीला रातघोड्या पासून घोडारथ यात्रेला प्रारंभ झाला, रातघोड्याच्या मिरवणूकित हजारों भाविक भक्तांनी सहभागी होत चिमुर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले, श्रीहरी बालाजी मंदिराला ३९५ वर्षाचा इतिहास आहे. मंदिराची वास्तु भोसलेकालींन आहे, चिमुर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रेला २४९ वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली, आजही तेवढ्याच उत्साहात यात्रेत महाराष्ट्रासहीत छत्तीसगढ़ मध्यप्रदेश राज्यातील भाविक भक्त दर्शन घेण्यास मोठ्या संखेने गर्दी करतात,
पोलीस स्टेशन चिमूर तर्फे ठाणेदार मनोज गभने, Api मंगेश मोहोड, Psi अलीम शेख, पोलीस अंमलदार शुकराज यादव, मोहन धनोरे, सचिन खामनकर, प्रमोद गुट्टे इत्यादीचे उपस्थित गोपाल काला निमित्त श्रीहरी बालाजी भक्तांना जुना बसस्टॉप येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले नागरिकांन मध्ये चिमूर पोलीस स्टेशन कवतुक करताना नागरिक दिसत होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close