ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने केला कृषी दिनी बांधावर शेतकऱ्यांचा सत्कार

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला .हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या कोरोनाच्या या बिकट काळात सर्वजण घरी बसले असले तरी बळीराजा मात्र दिवसरात्र मेहनत घेऊन अन्नधान्य पिकवत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले प्रत्येकाला घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात आले . मात्र, या काळातही शेतकरी जीवाची पर्वा न करता मशागतीच्या कामात गुंतला होता . जगाचा पोशिंदा असलेल्या या बळीराजा च्या कार्याचे कौतुक करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतीने नुकताच शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . टाळबंदित संपुर्ण देश थांबला असताना बळीराजा माञ आपले काम अविरत पणे करीत होता . जगाला अन्न पुरविण्यासाठी बळीराजा चे घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे . त्यामुळे बळीराजा चां सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे , न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर , विनोद कोठारे, रंजीत कुडे , राहुल कुडे , विजय कुडे , तेजस ऊरकुडे , दीपक कुडे , साहिल पानतावणे उपस्थीत होते.

प्रतिक्रिया-
“या कृषी दिनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत शेती करणाऱ्या या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करू .ज्या दिवशी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरवता येईल तेव्हाच खरा कृषी दीन साजरा होईल.
:–अभिजीत कुडे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close