तायक्वांदो मार्शल आर्ट क्लब च्या खेळाडूंना यलो बेल्टचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील तायक्वांदो मार्शल आर्टस् क्लब च्या खेळाडूंना शुक्रवारी एका छोटेखानी कार्यक्रमात यलो बेल्टचे वाटप जायकवाडी पाटबंधारे उप विभागाचे उप अभियंता दिवाकरराव खारकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थितीत शाखा अभियंते ए पी चिखलीकर, योगेश शर्मा पत्रकार किरण घुंबरे पाटील, या अकॅडमीच्या प्रशिक्षिका संगिता ढगे यांची उपस्थिती होती. नुकतेच परभणी येथे वैष्णवी मंगल कार्यालया मध्ये तायक्वांदो असोसिएशन परभणी व महाराष्ट्र असोसिएशन च्या वतीने तायक्वांदो बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत पाथरी तालुका,बी रघुनाथ कॉलेज,विद्यापीठ अशा एकूण ६९ मुले मुलींनी सहभाग नोंदविला होता यात पाथरीचे तायक्वांदो मार्शल आर्ट्स क्लबच्या संगिता ढगे चे एकूण १० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंना येलो बेल्ट परीक्षे मध्ये उत्कृष्ट एक्झाम देऊन येलो बेल्ट यश मिळविले होते. त्यात आरोही आवचार,प्रणिता शिंदे,यश शिंदे,स्वरुपा रोडे,श्रेया रोडे,शुभम पाणखेडे,स्नेहल चव्हाण,वैभवी शहाणे,कामरान सय्यद,श्रेया खंदारे या खेळाडूंचा सहभाग होता या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशस्तिपत्र आणि एलोबेल्ट देण्यात आले. या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक संगिता ढगे जिल्हा मुख्य कोच तुकाराम ठोंबरे यांनी घडविण्यास परिश्रम घेतले.