माळी महासंघाचे अविनाशभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमास किराणा धान्य कीट वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माळी महासंघ पाथरीचा उपक्रम
पाथरी तालुका .अखील भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे मा. उपाध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाथरी तालुका माळी महासंघ पाथरी व आकांक्षा मानव विकास संस्था पाथरी यांच्या वतीने ओंकार वृद्धाश्रम पाथरी या ठिकाणी भेट देऊन येथील वृद्धांसाठी किराणा व धान्य कीट वाटप करण्यात आली यावेळी अविनाशभाऊ ठाकरे समाजहितासाठी करीत असलेल्या कामाविषयी चर्चा करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी करमणूक म्हणून जेष्ठ शाहीर मधुकर पाटील यांनी गीत गायन केले तसेच यावेळी परभणी जिल्हा माळी महासंघाचे उपाध्यक्ष उद्धवराव इंगळे ,आकांक्षा मानव विकास संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंदे, सचिव विश्वंभर गिराम तसेच सदस्य बालाजी मकरंद ,भास्कर आबा कोल्हे ,भागवत पितळे तसेच पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी ,पत्रकार शेख सिकंदर बाभळगाकर उपस्थित होते यावेळी उध्दव इंगळे, बालाजी मकरंद पत्रकार शेख सिकंदर यांनी मनोगत व्यक्त केले .