मराठा सेवा मंडळ महानगर जिल्हा अध्यक्ष पदी गोविंद इक्कर पाटील यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठा सेवा मंडळाची जिल्हास्तरीय बैठक हॉटेल अतिथी येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष नितीन भैया देशमुख उपस्थित होते तर मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते नाना तर प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष गजानन जोगदंड आयोजक मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड यांची उपस्थिती होती आज या बैठकीमध्ये मराठा समाजाचे ओबीसी मधील आरक्षण,मराठा समाजाचे वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची योजना सर्व समाज बांधवांना पर्यंत पोहचवणे, पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती विद्यार्थ्या ना मिळावी या विषयावर चर्चा करण्यात आली यानंतर परभणी मराठा सेवा मंडळ महानगर जिल्हा अध्यक्ष पदी गोविंद इक्कर पाटील,तर नवनाथ पवार उप जिल्हाध्यक्ष, अंगद मस्के जिल्हा संघटक,रमेश देशमुख मुख्य सल्लागार,नवनाथ मोरे तालुका अध्यक्ष, शुभम घुले जिल्हा सरचिटणीस,दीपक बिडवे शहरप्रमुख,योगेश मोरे तालुका संघटक,उमेश येरालकर शहरप्रमुख,गजानन मोहरालकर परभणी ग्रामीण अध्यक्ष यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले यावेळी स्वप्निल गरुड सतीश का हात गणेश चोपडे,प्रीतम पैठाने प्रशांत टाक,पवन ठाकुर यांच्या वतीने त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले .