दर्गा यु पी सी त पिण्याच्या पाण्याची व महिला कर्मचाऱ्यांच्या शौचालयास पाण्याची व्यवस्था करण्याची लोकश्रेय मित्र मंडळा ची आयुक्ता कडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी (जि प्र) शहरातील नामवंत सय्यद शहा तुराबुलहक (रहे) येथील दर्गा यु पी सी मध्ये महिलांना पिण्याच्या पाण्याची व शौचालय व लघुशंका साठी लागणारे पाणी ची सुवीधा नसल्याने महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना व महिलांना अळचनीचा सामना करावा लागत असल्याने या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या कडे केली आहे .

कचरा कुंडी च्या ठिकाणी मनपा सिमेंट चे बाकळे टाकून नागरीकांना बसण्याची व्यवस्था करीत असल्याने चागले उपक्रम राबवित आहेत
लाडकी बहीन योजनेच्या नावाखाली अनेक महिलांनी फार्म भरण्यासाठी केलेली गर्दी अस॓ताना तेथे पिण्याच्या पाण्याची कुठलिही सुविधा नसुन शौचालय च्या ठिकाणी लघुशंकेसाठी महिलांना पाणी नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे
मनपा आरोग्य विभागातील महिला कर्मचारी तेथे सेवा करीत अस॔ताना त्या॓ना देखील अडचण निर्माण होत असल्याने पाण्याची व्यवस्था करवी अशी मागणी मनपा कडे सलीम इनामदार यांनी केली आहे .