महसूल विभागातील नवदीप काळाच्या पडद्याआड

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने नवदीप वालोदे यांचे दुःखद निधन
वालोदे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर;अनेकांनी व्यक्त केला दुःखवटा
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागात आपल्या कार्यशैलीने लोकप्रिय ठरलेल्या नवदीप वालोदे यांचे काल रात्री अंदाजे दहा वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय अवघ्या ३५वर्षांचे होते.त्यांना चिमुकली दोन मुले आहेत.ते आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी शेगांव येथे गेले होते असे राजूराचे त्यांचे जिवलग मित्र आक्रोश जुलमे यांनी आज सकाळी सांगितले.गेल्या काही वर्षांपासून नवदीप हे चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागात कार्यरत होते.त्यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच रविवारी पहाटे महसूल विभागाचे कर्मचारी भुषण रामटेके, सचिन गांजरे, राजेश निखारे हे शेगांव कडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान चंद्रपूर महसूल विभागाचे कर्मचारी राहुल फणसे हे शेगांवला पोहोचले आहे.बुलढाणा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी हे सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाले असून ते वालोदे कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करीत आहे.नवोदीपच्या आकस्मिक निधनाने वालोदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या अनेक पदाधिकारी व सदस्यगणांनी नवदीप वालदे यांच्या निधनाबद्दल दुःखवटा व्यक्त केला आहे.आपण आपल्या आयुष्यात आज एक दिलदार मित्र गमावला अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत पटवारी संघटनेचे पदाधिकारी राजूरा उपविभागाचे पटवारी सुनिल रामटेके यांनी दिवंगत नवोदीपला आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या वतीने मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे रंज्जू दिलीप मोडक, नलिनी आडपवार, पुरुषोत्तम कोमलवार, राजेंद्र पचारे, दत्तात्रय समर्थ,किरण साळवी व अन्य पदाधिकारी व सदस्यगणांनी दुःखवटा व्यक्त करीत दिवंगत नवोदीपला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.