सार्वजनिक शिव जन्मोत्सव कार्यालयाचे पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
येत्या फेब्रुवारी महिन्यात साजरी होत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन आज राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी खा.संजय जाधव, आ. डॉ.राहुल पाटील,रवी भाऊ पतंगे ,आनंद भरोसे,डॉक्टर अनिल कांबळे,सुनील देशमुख,सुरेश भुमरे, गणेश घाडगे,डॉक्टर विजय बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आयोजन समिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड,जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, अनिता ताई सरोदे,धर्मराज चव्हाण,आरोही खंदारे, नितीन गोगलगावकर, विद्या जोंधळे, मुमताज शेख, गोविंद ईक्कर,नितीन जाधव,संतोष भिसे,मंगेश भारकड ,आरोही खंदारे,वसंत शिंदे मुंजा खोंडवे,रमेश देशमुख,संदीप गव्हाणे, आदी मोहिते,राजेश पवार,सुरेश लोहट, राज ढव्हाळे, गोपाल मोहिते, गोविंद गिरी, अर्जुन काळे, दीपक कांबळे, विशाल सूर्यवंशी, सह विविध सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वर्षी संपन्न होत असलेल्या शिवजयंती महोत्सवात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून घोडे, हती ,पालखी, झांज पथक , लेझिम पथक,ढोल पथक,मर्दानी खेळ,तलवार बाजी,पारंपरिक खेळ विविध प्रकारचे लोककला पथक महोत्सवात सादर होणार आहेत.