पाथरीत गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी

पाथरी , मानवत अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात पाथरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शहरा बाहेर असलेल्या गादी कारखान्याला शॉटसर्किट ने आग लागली . यात मोठे नुकसान झाले , ही घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली . पाथरी व मानवत पालिकेच्या अग्निशमनच्या चार बंबाने आग आटोक्यात आणली .

शहरा बाहेर आष्टी फाट्यावर असलेल्या भारत गादी कारखान्यात रुई व कापडापासून गाद्या , उशी , रझई बनवण्याच्या काम करण्यात येते . तसेच गादी व्यवसाया बरोबरच फर्निचर साहीत्य ही विक्री साठी ठेवण्यात आले होते . आज ( ता . २४ ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी कारखान्यातील कामगारांनी प्रयत्न केला परंतू काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत आगीचे लोळ उठले . यावेळी नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले परंतु आग आटोक्यात येत नसल्याने मानवत पालिकेच्या अग्निशामक दलाची मदत घेण्यात आली असता दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले . तो पर्यंत गादी कारखान्यातील रुई , फर्निचर गाद्यांसाठी रुईची मशीन , कपडा . शिलाई मशीन , सोफा सेट , कपाट , कुलर अदी साहीत्य जळून खाक झाले आहे . यात लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे . आग आटोक्यात आणण्यासाठी पाथरी अग्निशमन दलाचे फायरमन शारेफ खान . बळीराम गवळी तर मानवत दलाचे शेख कलीम , रामा दहे व महेश कुमावत यांनी महत्वाची भुमिका बजावली .