सिखे इंडिया उत्सव देऊलागुडा येथे आयोजित

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
जि.प. प्राथमिक शाळा, देऊलागुडा जिवती तालुक्यातील सीखे इंडिया अंतर्गत असलेल्या TIP कार्यक्रम प्रदर्शनाचा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बंडू फुलझेले, सहाय्यक शिक्षिका वर्षा चौधरी सरपंच जाधव ताई, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणिताचे व भाषा विषयाचे वेगवेगळे मॉडेल, चार्ट, ठेवले होते. यावेळेस पालकांनी उत्साहाने आणि उत्सुकतेने विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारले.मागील दोन वर्षापासून जिवती तालुक्यात टीचर इनोव्हेटर कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना भाषा आणि गणित विषयाच्या विविध पद्धतींचे सिखे संस्थेमार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्यानंतर वर्षभर या शिक्षकांना कोचिंग केले जाते. विद्यार्थी या सर्व पद्धतीचा सराव त्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेत करत असतात. वर्षाच्या शेवटच्या सत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या पद्धतींचे वेगवेगळे मॉडेल बनवून प्रदर्शित करतात.या कार्यक्रमात 68 विद्यार्थी उपस्थित होते
वहा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बंडू फुलझेले आणि
वर्षा चौधरी आणि सिखे संस्थेचे कोच मोहन चुक्काबोटलावांर, सोमेश पेंदाम सहकार्य केले.