ताज्या घडामोडी

पिपर्डा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन छात्रभारती व ग्राम शक्ती ग्रुप पिपर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ७ फरवरी ला सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपर्डा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी २२ रक्तद्यात्यानी रक्त दान केले या वेळी छात्रभारती प्रमुख इम्रान कुरेशी,हसंदास कळाम,भगवान कावळे,आकाश भेंडारे,विनोद मोहूर्ले,यांनी अथक परिश्रम घेतले.ब्लड बँक डोनर कार्ड देऊन दात्यांचा गौरव करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close