अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शहरातील सेंट्रल नाका येथे शुक्रवारी संध्याकाळी कार व दुचाकीत झालेल्या अपघात प्रकरणी कारच्या चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पाथरी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सेंट्रल नाका येथे शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला होता . यामध्ये दुचाकीवरील पाथरी विविध सेवा सोसायटीचे सदस्य विलास नारायण भोसले यांचा मृत्यु झाला होता . याप्रकरणी मृताचे भाऊ रमेश भोसले यांनी पाथरी पोलीस ठाण्यात सोमवार 25 सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातीतील ब्रिजा कार क्रमांक एम एच 21 बी व्ही O464 च्या आरोपी चालकाविरुद्ध ताब्यातील कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे भाऊ विलास नारायण भोसले चालवत असलेली मोटरसायकल क्रमांक एमएच22 एबी 5468 ला पाठीमागून जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कराड हे करत आहेत .