ताज्या घडामोडी

गृह खात्याचे दुर्लक्ष असलेली पोलिस अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरा


पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर ची निवेदनाद्वारे मागणी.

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

RSI – RPI – R DYSP यांची सात वर्षांपासून रिक्त असलेली 119 पदे लवकरात लवकर भरण्यात यावी , या मागणीचे निवेदन आज दिनांक 08 / 06 / 2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे पोलीस महासंचालक साहेबांना देण्यात आले, यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक भगत सर यांनी हे निवेदन स्वीकारले.
सात वर्षापासून पदोन्नती पासून रिक्त असलेली आर एस आय/ आर पी आय/ डी वाय एस पी यांची 119 पदे लवकरात लवकर भरण्यात यावी. 26 फेब्रुवारी 2014 रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत विविध परिक्षेत्रातील अहर्ता परीक्षा राखीव पोलीस उपनिरीक्षक (आर एस आय) पदासाठी घेण्यात आली होती. राखीव पोलीस उपनिरीक्षक आर एस आय यांची सध्या 72 पदे रिक्त असून त्यांना राखीव पोलीस निरीक्षक आरपीआय या पदावर पदोन्नती देण्यात यावी. तसेच आरपीआय यांना सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक आर डीवायएसपी या पदावर पदोन्नती देण्यात यावी.सध्या डी वाय एस पी चे रिक्त 40 पदे रिक्तआहे. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षक प्रशिक्षण हे पद अस्तित्वात आहे.या पदावर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक च्या धर्तीवर सशस्त्र पोलीस उपअधीक्षक डी वाय एस पी या पदावर नेमणूक करावी.तसेच प्रत्येक आयुक्तालयात सशस्त्र पोलीस उपअधीक्षक आर डी वाय एस पी यांची नेमणूक करण्यात यावी. महाराष्ट्र पोलीस दलातील राखीव पोलीस उपनिरीक्षक आर एस आय यांची 73 पदे तसेच राखीव पोलीस निरीक्षक आरपीआय यांची 6 पदे व सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप अधीक्षक आर डी वाय एस पी यांची 40 पदे अशी एकूण 119 पदे रिक्त असून मागील सात वर्षापासून या पदाकडे गृह खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून पोलीस बाईस असोसिएशन या मागणीला घेऊन 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील या मागणीचे निवेदन देण्यात आले होते व अजूनही त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक साहेबांनी या प्रकरणाकडे स्वतः जातीने लक्ष घालून रिक्त पदावर तात्काळ नेमणूक करावी व सर्व पोलिस अधिकाऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे,
जिल्हा उपाध्यक्ष – साहिल मडावी,
जिल्हा संघटक – सद्दाम अन्सारी,
कार्यकारी अध्यक्ष – राकेश काकोडे,
शहराध्यक्ष – देविदास बोबडे,
शहर उपाध्यक्ष – बशीरभाई अन्सारी,
जिल्हा सचिव – संजय खोब्रागडे,
विधी सल्लागार – ऍड. आशिष नगराळे
महिला आघाडी संघटिका – मंथना ताई नन्नावरे,
सहसंघटिका – रितूताई शिंदे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close