ताज्या घडामोडी

साईबाबा जन्मस्थान मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा जन्मस्थान मंदिरात करोना बाबतचे शासकीय नियमांचे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा करण्यात आला या प्रसंगी रात्री साडेदहा ते पावणे बारा कीर्तन झाले त्यानंतर वेदशास्त्रसंपन्न उमेश जोशी सावरगावकर गुरुजी यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या 15 व्या अध्यायाचे पठण केले .भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला. याप्रसंगी पाळणागीत झाले एडवोकेट अतुल चौधरी सचिव तथा कार्यकारी विश्वस्त यांचे शुभहस्ते भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. रात्री बारा पाच वाजता साईबाबांची शेजारती समितीचे पुजारी योगेश इनामदार वाळूंजकर शास्त्री यांचे शुभहस्ते झाली .दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊ मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी छाया कुलकर्णी यांनी सपत्नीक भगवान श्रीकृष्णाची यथासांग अभिषेक पूजा केली पौरोहित्य उमेश गुरू जोशी सावरगावकर यांनी केले. सकाळी साडेदहा ते अकरा पंचेचाळीस काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर अडवोकेट अतुल चौधरी सचिव तथा कार्यकारी विश्वास यांचे शुभहस्ते दहीहंडीचा कार्यक्रम झाला दहीहंडीच्या निमित्ताने फुगड्या पावल्याचे कार्यक्रम झाले दुपारी बारा पाच वाजता योगेश ईनामदार शास्त्री यांच्या शुभ हस्ते साईबाबांची मध्यान आरती झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close