खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ सरकार ग्रूप वरोरा तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
चंद्रपूर-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सूरेश उर्फ बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्रीचे वाटप,गरजू शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे वाटप, तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार केला गेला. अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा तर्फे करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, रविंद्र धोपटे,माजी सभापती पंचायत समिती वरोरा, संजिवनी भोयर माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा, सुनंदा जिवतोडे माजी जि.प.सदस्य,मिलिंद भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी वरोरा, प्रशांत काळे तालुका अध्यक्ष काँग्रेस भद्रावती,बसंत सिंह सामाजिक कार्यकर्ता, इत्यादी मान्यवर व यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी, मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन डॉ.प्रशांत खुळे यांनी केले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी खासदार बाळू भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिले व खासदार बाळू भाऊ यांनी सर्वसामान्याचे आभार व्यक्त केले. यावेळी राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा यांच्या कडून खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या कार्याचा मनोगतातून गुणगौरव करण्यात आला .यानंतर खासदार बाळू भाऊ व मान्यवरांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला व यावेळी भोजनाची सोय करण्यात आली होती या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा चे संस्थापक अध्यक्ष काशिफ खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केले होते.