ताज्या घडामोडी

नरेंद्रभाऊ गाडगीलवार यांचे महसूल अधिकाऱ्यानं विरोधात आमरण उपोषण

नरेंद्रभाऊ गाडगीलवार यांचे महसूल अधिकाऱ्यानं विरोधात आमरण उपोषण

तालुका प्रतिनिधी : सनम टेंभुर्णे

ब्रम्हपुरी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या छत्रछायेत मोठ्या प्रमाणावर कथित रेती मुरूम चोरी हिट असून. चोरांनी रेती घाटांवर आणि रस्त्यांवर हैदोस घातला आहे. त्यामुळे नदीपात्रात परवानगी नसताना शेकडो ट्रॅक्टर आणि जेसीबी द्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नदीकिनारील गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोबतच या चोरांमुळे अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे अपघात होताना दिसतायत. काहींना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अवयव कायमस्वरूपी गमवावे लागले आहेत. अनेक जंगली प्राण्यांचा अपघात होऊन जीव गेल्याचे दिसत आहे. पण यावर प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाही होत नसून तहसीलदार सतीश मासळ तसेच संबंधित कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. याविरुद्ध दिनांक 1/6/2026 पासून शिवसेना तालुका प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नरेंद्रभाऊ गाडगीलवार यांचे महसूल अधिकाऱ्यानं विरोधात आमरण उपोषण सुरु असून संपूर्ण ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close