व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीची चित्रकला स्पर्धा
शेंकडों शालेय विद्यार्थ्यांनी घेतला भाग
स्पर्धकांनी रेखाटली विविध आकर्षक व मनोवेधक चित्रे
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
१५ऑगस्ट दिना निमित्त भद्रावतीच्या स्थानिक व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने शनिवार दि.१२ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान या आयोजित स्पर्धेला शेकडों शालेय विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.ही स्पर्धा उपरोक्त सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण विजय साळवी यांनी आज आयोजित केली होती.सदरहु चित्रकला स्पर्धा भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घेण्यात आली ही स्पर्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती.वरील स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक संजय मासळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.स्पर्धेत उत्कृष्टरित्या चित्र रेखाटणा-या विजेत्यांना येत्या १५ऑगस्टला एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहाल करण्यात येणार आहे. या स्पर्धेची परीक्षक म्हणून क्षितीज शिवरकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल भगत ,रेखा टेकाम , कल्याणी कांबळे,शिवानी काकडे, सिंधूताई मडचापी , रजनी खटाळे ,साधना उपगणलावार कलावती कोडापे, विनोद ठमके कल्याणी कामडे,बबन टेकाम ,पूजा टेकाम ,शिला कांबळे, शुभांगी मालेकर , कमल मेश्राम,चंद्रकला थेरे,ज्योसना खुटेमाटे,सुरेखा पाटील,पुष्पा नगराळे,अनिता कुमरे यांचेसह शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले . भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे कु.किरण विजय साळवी यांनी सांगितले.