जन्मस्थान मंदिरात आज विजयादशमी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारंभ झालेल्या विजयादशमी उत्सवाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती नंतर श्रींचे मंगल स्नान झाले.
उत्सवाचे सांगतेच्या दिवशी श्री ना के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शुभ हस्ते सपत्नीक साईबाबांची पाद्य पूजा करण्यात आली व प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक करण्यात आला. सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री ह भ प अंगद गुरुजी डाके गव्हाणकर यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन झाले त्यांना श्री ह भ प सुमंत महाराज डाके यांची साथ संगत लाभली त्यानंतर साई भक्तांनी कीर्तनामध्ये फुगड्या सादर केल्या यामध्ये परम साई भक्त सागर पातुरकर, विश्वस्त श्री संजय भुसारी, मंदिर प्रमुख सौ. छाया कुलकर्णी, सौ नीलिमा भुसारी व कीर्तनकार महाराज यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला, नंतर श्रींची महाआरती व नंतर महाप्रसाद झाला. विजयादशमी उत्सवानिमित्त कार्यक्रमासाठी परम साई भक्त श्री ओंकार संसारे, श्री विजय पितळे, सौ वृषाली पितळे, श्री नागेंद्र आनंतवार, श्री राजू पातुरकर तसेच दिल्ली, नाशिक, मुंबई, व औरंगाबाद आणि इतर साईभक्त उपस्थित होते. सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी राम रक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती होईल, सायंकाळी सात वाजता श्रींची पालखी निघेल. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांचा सांप्रदायिक भारुडाचा होईल. रात्री नऊ वाजता शेजारती होईल.
अशी माहिती समितीचे कोषाध्यक्ष विश्वस्त, श्री सूर्यभान सांगडे यांनी दिली.