ताज्या घडामोडी

मध्यप्रदेशातील एक छोट्याश्या गावात संस्थेतर्फे कपडे दान

प्रतिनिधी:पंकज चौधरी

समाजिक कार्यकर्ते तसेच विशेष शिक्षक सुनिल जनबंधू यांनी मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधू बहुुद्देशिय संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम राबवीत असतात . अपंग, निराधार, विधवा , अनाथ अशा गरजू लोकांसाठी कार्य करत असतात. त्यांनी मातोश्री शकुंतला जनबंधू बहुुद्देशिय संस्थेतर्फे माध्यप्रदेशात सौन्सर तालुक्यातील नांदुठाणा या एकच रोड गल्ली असलेल्या गावात कपडे दान करून त्यांनी आदर्श निर्माण केला त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
त्यावेळी त्यांनी संस्थेच्या विविधांगी कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमवेळी संस्थेचे संस्थापक, संचालक तसेच सचिव सुनिल जनबंधू , संस्थाध्यक्ष श्री. अनिलजी शेंदरे , श्री. रत्नाकरजी जुनघरे, सौ. नंदा जुनघरे , भंडारा ( तुमसर ) येथील सरपमित्र फागन नेवारे व गावातील काही पुरुष, पुरुष , लहान मुले मुली उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close