ताज्या घडामोडी

वरोरा तालुक्यातील मजरा (लहान) येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते आज वरोरा तालुक्यातील वरोरा, बोर्डा, सालोरी येन्सा ब्लॉक (मजरा लहान), मजरा(रै), येंन्सा,बेलगाव, दहेगाव व अनेक गावात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र,जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व ग्राम विकास योजनेअंतर्गत झालेल्या विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रामुख्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजूभाऊ चिकटे, तालुका काँग्रेस कमिटी वरोरा चे अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष मिलिंद भाऊ भोयर, संवर्ग विकास अधिकारी वरोरा, पंचायत समिती सभापती वरोरा, ढोक मॅडम पंचायत समिती सदस्य, प्रमोद मगरे, निब्रड ताई सरपंच ग्रामपंचायत मजरा लहान, उपसरपंच, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी कोरोना महामारी त कुटुंब प्रमुख गमावलेल्या मंदाताई धानोरकर यांना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सामाजिक दायित्व जोपासत मदतीचा धनादेश दिला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close