उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम संपन्न

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत शाळा आधारित पिट अँड फिशर कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नुकतेच घेण्यात आले.
सदर कार्यक्रम जिल्हा मुख्य आरोग्य कक्ष चंद्रपूर उपजिल्हा रुग्णालय चिमूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या कार्यक्रमाला डॉक्टर महादेव चिंचोळे (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर), डॉक्टर संदीप पिपरे (जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी तथा दंत शल्यचिकित्सक), डॉक्टर अश्विन अगडे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर) यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर राजेश शेंडे (दंत शल्य चिकित्सक उपजिल्हा रुग्णालय चिमूर) यांचे नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटाळा ,चिंचोली, वाढोणा ,मोखाडा व लावारी या शाळेतील एकूण 30 विद्यार्थी यांच्या 76 दातांवर दंत किडीच्या प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे पीठ अँड फिशर सिलंट उपचार शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील बाल दंततज्ञ या विभागातील प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. रितेश कळसकर व त्यांच्या चमू मार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रीती बोधलकर ,भक्ती यांचे मोलाचे सहकार्य लाभले . सदर कार्यक्रमाचे महत्त्व व उद्दिष्ट व भविष्यात होणारे लाभ हे डॉ रितेश कळसकर यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना समजावूण सांगितले व विविध आजारांवर सकारात्मक वार्तालाभ केला . सदर कार्यक्रम यशस्वी रित्यापार केल्याने विद्यार्थ्यांचे पालक त्यांनी डॉक्टर रितेश कळसकर सर व डॉक्टर संदीप पिपरे सर यांचे मनापासून आभार मानले . सदर कार्यक्रमाची सांगता मौखिक आरोग्याची शपथ देवून करण्यात आले .









